अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळण्यास विलंब , व्यथा घेऊन देवळी येथील शेतकरी रेल्वेमंत्र्याच्या दालनात……

0
5
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 13 फेब्रुवारी2024

नागपूर -वर्धा -यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्ग सुरू करण्याकरिता 10ते 12 वर्षापूर्वी बरेच अशा शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यावेळेस दिलेला मोबदला फार अल्प भावाने दिलेला होता. हा दिलेला मोबदला देवळी येथील शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी काही दिवसापूर्वी न्यायालयात धाव प्रकरण न्यायप्रविष्ट केले असता न्यायालयाने सुद्धा सदर जमिनीचे मूल्यांकन चारपट वाढून देण्यात यावे असे आदेश सुद्धा दिलेले होते. परंतु सदर भाव वाढीचे पैसे शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेले नाही, त्याकरिता त्यांना सरकारी यंत्रणेत वारंवार जाऊन चौकशी करावे लागत आहे. आणि पदरी निराशा प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांनी वर्धा जिल्हा खासदार रामदास तडस यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आपली व्यथा मांडत अडचणी सांगितल्या. रेल्वे मंत्र्यांनी प्रत्यक्ष वर्धा जिल्हाधिकारी यांचे संपर्क साधून त्याबाबतची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी विलास जोशी, शैलेश पाळेकर, मोहन ठाकरे, अनिल शिरसागर, जब्बार भाई, धनराज घुबडे, आणि काही शेतकरी यांनी संवाद साधला.