

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील देवसर्रा येथे दिनांक 14 फेब्रुवारीला तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या 25/15 सुविधा निधी अंतर्गत 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख राजेंद्र बघेले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पाडण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य कांचनलाल कटरे, सरपंच ताराबाई साखरे, उपसरपंच जितेंद्र कटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश तुरकर, संजय कटरे,विजय बिसने,महेंद्र बिसने,चंपालाल कटरे,भामेश्वर मेश्राम,पांडुरंग कटणकर,स्वातीबाई टेम्भेकर,मोतीलाल साखरे,उमेश भुरे,रितेस शुक्ला पिंटूभाऊ साखरे,सविताबाई भगत, अनिताबाई कटणकार्,रविकांता बिसने,व मोठ्या संख्येने देवसर्रा ग्रामवासी उपस्थित होते.


