चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंती निमित्त गोंदियात भव्य महारॅलीचे आयोजन

0
12
1

२५ हजारच्या वर रॅलीत पोवार बांधवानी लावली हजेरी

गोंदिया / धनराज भगत

पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजभोज यांची जयंती आज संपूर्ण देशा शह गोंदिया जिल्यात देखील हर्ष उत्साहात रॅली काढून साजरी करण्यात आली या वेळी राजाभोज समितीच्या वतीने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी पोवार समाजाच्या लोकप्रतिनिधीला उमेदवारी देऊन समाजाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी राजा भोज समितीच्या वतीने आज करण्यात आली आहे.
पूर्व विदर्भात गोंदिया भंडारा जिल्यात मोठ्या प्रमाणात पोवार समाज बांधव राहत असून दोन्ही जिल्यात लोकप्रतिनिधी निवडून आणण्यात पोवार समाज आपली महत्त्वाची भूमिका राबवित असून आज दोन्ही जिल्ह्यात पोवार बांधवानी चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्या जयंतीचे अवचित्त साधून गोंदिया शहरात भव्य रॅली काढण्यात आली असून जवळपास २५ हजार लोकांच्या वर समाज बांधवानी या रॅलीत सहभाग घेत जयंती साजरी केली.

 ☝️☝️राजकुमार पटले राजा भोज समिती संयोजक 
☝️☝️ पंकज रहांगडाले जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया

 

☝️☝️ केतन  तुरकर विशेष अतिथि 

आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभेत ओबीसी समाजाच्या लोकप्रतिनिधीला तिकीट देण्यात यावी त्यातच आज पोवार समाजाने आपला शक्ती प्रदर्शन करीत आगामी विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास समाज बांधवानी व्यक्त केला आहे.