विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, नागपुर अंतर्गत समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची असल्याने शासन परिपत्रकामध्ये नमुद अ.क्र. 3 मध्ये दर्शविल्यानुसार ईच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन आवश्यक कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी केले आहे.
सदरच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी घेतलेले निर्णय अंतिम राहील. याबाबत कुठल्याही न्यायालय/ प्राधिकरणा समोर अपिल करता येणार नाही, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.