गडचिरोली /प्रतिनिधी
आज १५/०२/२०२४ रोजी ३७ वी बटालियन सी. आर. पी एफ. पोलीस स्टेशन धोडराज येथे सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत गरजू व आदिवासी ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी बर्तन जसे कढाई, भांडी यांचे वाटप करण्यात आले. याच क्रमाने वैद्यकीय शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धोडराज, दरभा, बोडांगे, मर्दमलिंगा, जुवी, इरपनार, घोटपाडी, नेलगुंडा या दुर्गम व अति नक्षलग्रस्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३७ व्या बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद सातोरे व प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ४०० हून अधिक गरजू आदिवासी ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून सदर कार्यक्रमात सहभागी सर्व ग्रामस्थांना दुपारचे जेवण देऊन त्याच बरोबर औषधांचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुजित कुमार (द्वितीय कमान अधिकारी) यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी/३७ समवाय अधिकारी श्री. तरुण डोंगरे, सहा. कमांडंट, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद सातोरे व पोलीस स्टेशन प्रभारी P.S.I. शरद काकलिज, P.S.I. अमोल सूर्यवंशी, P.S.I. रमाकांत मुंडे आणि सी.आर.पी.एफ. व जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले.या कार्यक्रमात भामरागड तहसीलचे पदाधिकारी, शालेय कर्मचारी, सी.आर.पी.एफ. चे जवान व जिल्हा पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिविक एक्शन कार्यक्रमाचे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी भरभरून कौतुक केले. के. रि.पु.बल. ला आशा आहे की नागरिकांना सहकार्य करुन आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही परिसरातील लोकांचा नक्षलवादापासून भ्रमनिरास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यास मदत मिळेल.

