गोंदिया / धनराज भगत
महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक 19 जानेवारी 2024 च्या अधिसूचनेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक सुट्टी लक्षात घेता, या संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे. रविवार 18 फेब्रुवारी 2024 रोजी बाह्यरुग्ण विभाग नेहमीप्रमाणे सुरु राहील. सोमवार 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त बाह्यरुग्ण विभाग पुर्णपणे बंद राहील. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजयकुमार माहुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.