गोंदिया / धनराज भगत
दि.१६/०२/२०२४ शुक्रवार रोजी महाराष्ट्रातील मागासलेले अतिदुर्गम,संवेदनशील क्षेत्र सालेकसा तालुक्यातील चांदसूरज, बिचारपुर ह्या गावांना समाजसेवी डॉ. श्रीकांत श्रावण राणा (दंत चिकित्सक आमगांव) यानी भेट दिली,व गावातील सर्व ग्रामवाशी यांच्याशी संवाद साधला व गरजू लोकाचा “निःशुल्क आरोग्य उपचार” केला. कारण सालेकसा तालुका येथील दरेकसा क्षेत्र हे बहुसंख्यक आदिवासी समाजाने व्यापलेले क्षेत्र आहे, आणि आरोग्याच्या सोई उपलब्धतेत कमतरता असल्याने विचारपूर, चांदसूरज , टोयागोंडी ह्या गावातील जनसमुदायाला पाहिजे तितक्या आरोग्याच्या सोई उपलब्ध नाही म्हणून समाजसेवी डॉ. श्रीकान्त राणा (राने) यांनी गरजु लोकांचे मोफत आरोग्य उपचार केले आणि जे वयोवृद्ध आहेत अशा सर्वांना औषधि दिल्या.
याप्रसंगी एका वृद्ध महिलेने ने डॉ. राणा यांच्या डोक्यावर हात ठेऊन प्रेम रूपी आशीर्वाद दिले.तसेच गावातील सर्वात वयोवृद्ध गृहस्थ सुखाजी मडावी यानी डॉ.श्रीकांत राणा याना मीठी मारून रडत बोलले की बेटा आशीर्वाद आहे. जीवनात तुला सदैव यश प्राप्ति होवो. अशा प्रकारे अनेक जनसमुदाय उपस्थित होते. प्रामुख्याने गावातील वरिष्ठ कार्यकर्ता व युवा कार्यकर्ता उपस्थित होते.या मोफत आरोग्य उपचार शिबिरात १०० ते १५० लोकांनी उपचार घेतला असून त्याना आवश्यक औषधी ही देण्यात आल्या.
उपरोक्त कार्यक्रमात विचारपुर चे डॉ. कोकोटे, नंदू भाऊ बनोटे, चंद्रिकापुरे,मरकाम भाऊ, शैलेश, विनय, नीलकुमार यादव, वैभव पटले, कार्तिक पटले, मोहित शेंडे,सचिन येटरे,व सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

