प्रतिनिधि माइकल मेश्राम
सालेकसा ; गोंदिया जिल्हा पोलीस वार्तापत्र नुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे सालेकसा पोलिस स्टेशन हादित दि. १७ फेब्रू २०२४ ला एकाच रात्रि ३ लोकांच्या घरी चोरी झाली असुन प्रकरण अशा प्रकारे आहे की, दि.१६/०२/२०२४ चे ००:४० वा. ते ०१:३० वा दरम्यान मौजा आमगांव खुर्द सालेकसा येथे यातील फिर्यादी कोमल मेघराज जैन वय ४७ वर्षे, रा आमगाव खुर्द सालेकसा ता सालेकसा हे पत्नी व मुलासह रायपूर (छ ग.) येथे लग्न कार्यक्रमाकरिता गेला असतांना व त्याचे घरी त्याचा मोठाभाउ व परिवारातील इतर सदस्य हजर असतांना रात्रि दुकानाचे बाहेर व आतमध्ये लावलेल्या सिसी. टी. वी कॅमेऱ्यातील फुटेज मध्ये दिसणाऱ्या तीन अनोळखी ईसमानी लोखंडी सब्बल व लोखंडी रॉडनी फिर्यादीचे बरडीया ज्वैलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून सोन्या चांदीच्या दुकानातील रॅकमध्ये वेगवेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले चांदीचे दागिने अंदाजे ०३ किलो किमत २,००,०००/- रू . त्याच प्रमाणे सोन्याचे दागिने ०६ ग्रॅम किमती अंदाजे ३५,०००/- रू . बेनटेक्सचे दागिने किमती अंदाजे २०,०००/- रू व काउंटरमध्ये ठेवलेली नगदी २२,०००/-रू तसेच दुकानालगतचे मागील रूमच्या दरवाजाच्या कडीला एका कापडी थैल्यामध्ये दुकानातील खरेदी विक्रीची रोख रक्कम ८२,६६२/रू असा एकूण ३,५९,६६२/- रू चा माल दरोड़े खोरांनी मालावंर हाथ साफ केल्याची घटना उघड़कीस आली.
तसेच न्यु कॉलोनी सालेकसा येथील भगीरथ पटले यांचे घरी भाडयाने राहणारे नामे प्रवीण झंझाड व सोनु कुमार अग्रवाल यांचेघरी सुध्दा त्याच तीन अनोळखी इसमांनी चोरी केल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे सालेकसा येथे अप क. ३८/२०२४ कलम ४५७,३८०,३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि बुराडे पोस्टे सालेकसा हे करीत आहेत.

