श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार.

0
85

प्रतिनिधी – अभिजीत कोलपाकवार

आष्टी:-

 

आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून ही स्पर्धा ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न होत आहे दि १८ फेब्रुवारी ला सायंकाळी ५.०० वाजता महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली महीला अध्यक्ष शाईन हकीम, उपाध्यक्ष पुष्पा व्यंकटी बुर्ले, आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम, विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणय बुर्ले जिल्हा उपाध्यक्ष नोमेश जुवारे जिल्हा संघटक हेमंत भाकरे, गोलू पोटवार, जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी घोगरे, शहर अध्यक्ष राहुल डांगे, जिल्हा सरचिटणीस हरिश मंगाम, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन

श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने करण्यात आले आहे.