प्रतिनिधी अमोल कोलपाकवार
आलापल्ली:अहेरी परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमाडन्ट एम एच खोब्रागडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सरपंच शंकर मेश्राम,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते,डॉ.भूषण भडके, डॉ.धुर्वे, डॉ.गोपाल रॉय,डॉ चरनजित सिंह सलूजा,कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विविध आजाराचे योग्य निदान होऊन त्वरित उपचार व्हावे यासाठी एकाच छताखाली व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर पहिल्यांदा अश्या मोठ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा प्रतिसाद बघता या शिबिराचा रुग्णांसाठी किती महत्व आहे हे लक्षात आल्याचेही त्यांनी म्हटले.शिबिरासाठी उपस्थित तज्ञ डॉक्टर आणि शिबिरासाठी परिश्रम घेणार्या कार्यकर्त्यांचे बाबांनी आभार मानले.
माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गम भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणार्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एक आठवड्यापासून नियोजन करण्यात आले.खेड्यापाड्यातील नागरिकांना आलापल्ली येथे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,रायुकाचे अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार,नगरसेवक अमोल मुक्कावार,ग्रा प सदस्य मनोज बोलूवार,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके,सुमित मोतकुरवार,महेश येरावार आदींनी परिश्रम घेतले.
*शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी*
भव्य आरोग्य शिबिरात वोक्हार्ट हॉस्पिटल,दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था,संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी (मेघे),लॉड्स काली एमल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी,लॉड्स मेंटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आणि सलूजा नर्सिंग होम आलापल्ली येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.यात रक्तदाब,ब्लड शुगर,किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे सर्व आजार,हर्निया अंगावरील गाठी,आतड्याचे आजार, मुतखडयाचे आजार,कान, नाक,घसा, मणक्याचे आजार,खाज,दमा, मानसिक रोग,दातांचे आजार कॅन्सर रुग्ण तसेच मानसिक आजाराचे रुग्ण तपासणी करण्यात आले. तर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या नामांकित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.