भवभूति महाविद्यालयाचे नँक पीअर टीम द्वारे मूल्यांकनाचे कार्य पूर्ण

0
38
1

गोंदिया / धनराज भगत

राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नँक) बंगळूर द्वारे नेमलेल्या समितीने दिनांक १६ व १७ फेब्रुवारी रोजी भवभुती महाविद्यालय आमगाव ला भेट देऊन मुल्यांकनाचे कार्य पूर्ण केले.

तीन सदस्यीय समितीत चौधरी चरणसिंग विद्यापीठ मेरठ, उत्तर प्रदेश च्या प्रो वॉइस चांसलर डॉ. विमला येरामिली या अध्यक्षा होत्या तर डुन युनिव्हर्सिटी देहरादुन उतराखंड चे प्रोफेसर एच. सी. पुरोहित हे समन्वयक होते आणि सदस्य म्हणून भोपाल स्कूल ऑफ सोशल सायन्स भोपाल मध्य प्रदेश येथील प्राचार्य डॉ.जोसेफ पी पी हे होते. या तिघांनी भवभूती महाविद्यालयास दिनांक १६ व१७ फेब्रुवारी २०२४ ला मुल्याकंनासाठी भेट देऊन या महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेऊन सुक्ष्म परिक्षण केले. १६ फेब्रुवारी ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, पी. के. रहांगडाले यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीन विकासाचा व कामकाजाच्या सखोलअहवालाचे इलेक्ट्रॉनिक पावरपांईट च्या माध्यमातून नँक समिती समोर सादरीकरण केले. नँक समितीने सर्व उपक्रमांचा; विज्ञान, कला वाणिज्य, ग्रंथालय, शारिरीक शिक्षण , राष्ट्रीय सेवा योजना या सर्व विभागांचा व कार्यालयीन लेखा-जोखा इत्यादिंचा समितीने प्रत्यक्ष परीक्षण करून सखोल आढावा घेतला. भेटी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सभा, नंतर माजी विद्यार्थी,पालक यांची सभा घेवून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांचे विचार/सुझाव जाणून घेतले. दिनांक१६ फेब्रूवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन केले. नँक चमू च्या भेटी दरम्यान भवभुती संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबु असाटी, कार्यवाह केशवराव मानकर संचालक हरिहर मानकर, ललीत मानकर, स्नेहा मानकर यांनी नँक समिती सोबत चर्चा केली. नँक समितीने महाविद्यालयाची संपूर्ण पाहणी व परीक्षण केल्यानंतर आपला परीक्षणअहवाल तयार करून तो प्राचार्य डॉ पी के रहांगडाले यांना सादर केला.
याप्रसंगी आयक्यूयेसी चे समन्वयक डॉ.संजय तावाडे, ग्रंथपाल प्रज्ञा भगत यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. चंद्रगिरिवार, डॉ. शिंगाडे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.