आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा गोंदिया जिल्हा दौरा कार्यक्रम

0
104

गोंदिया / धनराज भगत

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे बुधवार 21 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मुंबई येथून सकाळी 7.10 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने कचारगड ता.सालेकसा कडे प्रयाण. दुपारी 12 वाजता कचारगड येथे आगमन व पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान येथे भेट. दुपारी 12.30 वाजता कचारगड येथून शासकीय वाहनाने सालेकसा कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सालेकसा येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता सालेकसा येथून शासकीय वाहनाने पुराडा कडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता पुराडा येथे आगमन व माजी आमदार संजय पुराम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 4 वाजता पुराडा येथून शासकीय वाहनाने देवरी कडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता देवरी येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता देवरी येथून शासकीय वाहनाने कुरखेडा जि.गडचिरोली कडे प्रयाण.