ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती साजरी

0
83

गोंदिया / धनराज भगत

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदिया जिल्हा च्या वतीने दि.19 फेब्रुवारी 2024 ला सुभाष उद्यान गोंदिया येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज व चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती त्यांच्या छायाचित्रांना पुष्पांजली वाहून साजरी करण्यात आली.

या प्रसंगी संघाचे अध्यक्ष नारायणराव जमईवार, कार्याध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे, सचिव  दुलीचंद बुद्धे यांनी या दोन्ही महापुरुषांच्या लोकोत्तर कामावर प्रकाश टाकला. राजा भोज बद्दल बोलताना लखनसिंह कटरे यांनी ‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली” या अपभ्रंशित म्हणीचा खरा उच्चार काय ते सांगून राजा भोज बद्दल अद्यावत संशोधनाची थोडक्यात पण मुद्देसूद माहिती दिली.

याप्रसंगी दुलीचंदची बुद्धे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून समाजातील विविध घटकात होऊन गेलेल्या महापुरुषांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी दर महिन्यात त्या त्या महिन्यात जयंती व/वा पुण्यतिथी येणाऱ्या महापुरुषांना आवर्जून सामूहिक पुष्पांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवला असता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्याला अनुमोदन दिले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सुमारे 20-25 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.