सालेकसा येथे शिवाजी महाराज जयंती संपन्न
भव्य शिव रॅलीने दुमदुमली सालेकसा नगरी
सालेकसा / बाजीराव तरोने
शून्यातून स्वराज्य निर्माण करून त्याचं सुराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तसेच दिन-दुबळे, गोर-गरीब, शेतकरी व बहुजन यांच्या कल्याणासाठी सतत धडपडत राहिले त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ग्वाही आणि साक्ष देत आहेत.
प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट दिली पाहिजे आणि प्रेरणा घेतली पाहिजे असे वक्तव्य सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांनी केले. ते कुणबी समाजसेवा समिती सालेकसा द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाच्या मार्गदर्शक स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर बिरसा मुंडा या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाताई मेंढे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटन विजय भाऊ शिवणकर माजी जि. प. अध्यक्ष, दीपप्रज्वलक म्हणून सावळरामजी बहेकार, प्रा. गिरीजी देशमुख, त्रिवेणी हत्तीमारे, वंदनाताई काळे जिल्हा परिषद सदस्य, डॉ, योगेश सोनारे, विमलताई कटरे जिल्हा परिषद सदस्य, छायाताई नागपुरे जि. प. सदस्य, प्रमिलाताई गणवीर सभापती पंचायत समिती सालेकसा, रेखाताई पुंडे पंचायत समिती सदस्य, लताताई दोनोडे, रमेशजी चुटे अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, श्यामलालजी दोनोडे, देवरामजी चुटे, चंद्रकुमार बहेकार, रिनाताई मेंढे सरपंच,अनिताताई फुंडे सरपंच, प्रवीण पाटील, देवराम खोटेले, टेकचंद फुंडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिवरायांना डोक्यावर नाही तर त्यांचे विचारांना डोक्यात घेणे हि काळाची गरज त्यांच्या विचारावर प्रत्येक वर्तमानातील मावळ्यांनी वागले पाहिजे म्हणजे महिलांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे वक्तव्य प्रमुख मार्गदर्शक शिव व्याख्यात्या त्रिवेणी हत्तीमारे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला सहयोग करणाऱ्या विविध व्यक्तींचा उपस्थित अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बारसे यांनी मांडली तर कार्यक्रमाचे संचालन पवन पाथोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पायल बहेकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी समाजसेवा समिती सालेकसा, महिला कुणबी समाजसेवा समिती, युवा कुणबी समाजसेवा समिती तसेच बहुजन समाजातील विविध मान्यवरांनी विशेष सहकार्य केले.
शासकीय नौकरीत रूजू झालेल्या या युवकांचा करण्यात आला सत्कार
कार्यक्रमाचे औचित्य साधून नोकरीत लागलेल्या तालुक्यातील विविध तरुणांचा सत्कार करण्यात आलेला असून त्यात अर्पिता बहेकार, अंजली हत्तीमारे, उमेश बहेकार, पल्लवी शेंडे, अरविंद बहेकार, पायल चुटे, सुधीर बहेकार, विशाल शिवणकर, राहुल भांडारकर, प्रियंका भांडारकर, लाभिणी कठाने, रोहित कोरे, शामराव फुंडे, शैलेश शेंडे, सुस्मिता बहेकार, पांडुरंग थेर, लखन चुटे, अमित भांडारकर, खुशाली वाढई, अमित ब्राह्मणकर, स्वाती मुनेश्वर, मोहित दोनोडे, भुमेश बहेकार यांचा उपस्थित अतिथीच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ च्या वेशभूषेतील तरुणाई ठरली आकर्षणाचे केंद्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कुणबी समाज सेवा समिती सालेकशाच्या वतीने सालेकसातील नगरातून भव्य शिव रॅली करण्यात आली असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा तसेच राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या तरुणाईला घोड्यावर बसवून रॅली काढण्यात आले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

