गोंदिया – ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यास मुंबई येथून आमगाव पोलीसांनी केले जेरबंद

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

 गोंदिया शेअर बाजारातुन जास्त नफा मिळवुन देतो असे ऑनलाईन आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने वेगवेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणाऱ्यास आमगाव पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले आहे.तक्रारदार दिलीपकुमार अशोक मटाले रा. मौजा शिवणी,ता.आमगाव जि. गोंदिया यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुक झाल्याबद्दल दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन- आमगाव येथे दि.26 जुन 2023 रोजी अप.क्र.205/2023 कलम 420,34 भा.दं.वि.सहकलम 66 (क), 66 (ड) माहीती तंत्रज्ञ अधिनियम 2000 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता.गुन्हयातील आरोपी व पाहीजेत असलेले संशयीत आरोपीचा शोध घेण्याकरीता पोलीस स्टेशन आमगाव येथील पोलीस पथक मुंबई करिता रवाना करण्यात आले होते.पोलीस पथक सपोनि.गणपत धायगुडे, सपोउपनि.शेंन्द्रे,व पोशि.साबळे हे मुंबई येथे आरोपीचा शोध करीत असताना आरोपी हा वारंवार आपले मोबाईल क्रमांक बदलत असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड जात होते.असे असतांना सुध्दा पोलीस पथकाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मानवी कौशल्याचा वापर करुन व प्राप्त गोपनीय माहीती व गुन्हयातील आरोपीचे तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन वेग-वेगळ्या फार्म च्या नावाने वेग- वेगळ्या चालु बँक खाते उघडुन त्यावर लोकांकडुन रक्कम प्राप्त करुन लोकांची फसवणुक करणारा आरोपी कल्पेश सतिश मिश्रा वय 38 वर्ष रा. सांताकृझ मुंबई यास त्याच्या राहते घरुन दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी सांताकृझ पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाच्या मदतीने छापा टाकुन पहाटे ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले. आरोपीस सदर गुन्हयात दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयाचा तपास आमगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे हे करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव विवेक पाटील,पोलीस निरीक्षक युवराज हांडे,प्रभारी अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनात सपोनि.गणपत धायगुडे,सपोउपनि शेंन्द्रे व पोशि.साबळे यांनी केली आहे.