उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

0
2
1

गोंदिया / धनराज भगत

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकरीता जिल्हास्तरावर 100 विद्यार्थी/विद्यार्थीनी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरु करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करीता शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
        तरी गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल यांचेशी संपर्क साधून वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
        सन 2023-24 करीता वसतिगृह निहाय रिक्त जागा :- इतर मागासवर्ग करीता- 46, विमुक्त जाती भटक्या जमाती करीता- 30, विशेष मागास प्रवर्ग करीता- 05, दिव्यांग करीता- 04, अनाथ करीता- 02 व आ. मा. प्रवर्ग (EMW)- 03, तसेच खास बाब करीता- 10 असे प्रत्येकी दोन्ही वसतिगृहांकरीता एकूण 100 जागा रिक्त आहेत.
        अर्ज वितरण व स्विकृतीकरीता विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आरटीओ ऑफिसचे मागे, गोंदिया (मो. 8275299320) आणि विद्यार्थीनींनी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, आरटीओ ऑफिसचे मागे, गोंदिया (मो. 8459908530) या वसतिगृहांमध्ये संपर्क साधावा. अधिक माहितीकरीता विद्यार्थी/विद्यार्थीनी व पालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी कळविले आहे.