गोंदिया / धनराज भगत
दि.१७ फेब्रूवारी २०२४ ते दि.१८ फेब्रूवारी २०२४ या दोन दिवस दरम्यान यातील फिर्यादी पल्लवी राधेश्याम बिसेन (वय ४२ वर्षे) रा. प्रज्ञा कॉलोनी लांजी रोड आमगाव ता. आमगाव यांच्या बंद घराचे दरवाज्याचा कुलूप तोडून घराचे आत प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागीने व दिवान पलंगच्या आत मध्ये ठेवलेले रोख रक्कम असा एकुण किमती २,६८,७००/-रु. ची मालमत्ता कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने, फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्टे आमगाव येथे अप क. ७३/२०२४ कलम ४५४,४५७,३८०, भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास परीपोउपनी साळुंके पोस्टे आमगांव, हे करीत आहेत.