खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत कचारगढ यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा

0
7
1

अनेक राज्यातील आदिवासी नागरिकांचे श्रद्धास्थान…

सालेकसा / बाजीराव तरोने

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या पाच दिवसीय भव्य यात्रा उत्सवाच्या तयारीचा मंगळवारी (दि.२०) आढावा घेण्यात आला. गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व उपस्थितीत घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समस्त आदिवासी समाजाचे आराध्य दैवत् समजल्या जाणाऱ्या माँ काली कंकाली कृपाल लिंगो, महागोंगो कोयापुनेम महापुजेनिमित्त कचारगड यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा दि.२२ ते २६ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान भरणार आहे. कचारगडच्या गुहेत यात्रा उत्सवादरम्यान दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून भाविक येत असतात. या पाच दिवसात लाखो भाविक कचारगडमध्ये दाखल होतात.

येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, खाणपाण, बसेस आणि रेल्वेची व्यवस्था, वीज पुरवठा, पोलिस बंदोबस्त, वाहनांची पार्किंग व्यवस्था, विश्रांतीची, निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृहे, केरकचऱ्याची विल्हेवाट, पथदिवे, ॲम्बुलन्स, आरोग्य तपासणीची व्यवस्था अशा विविध विषयांवर खासदार नेते यांच्या अध्यक्षतेखाली व उपस्थितीत आढावा घेण्यात आला.

यावेळी आढावा बैठकीला प्रामुख्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्राजित नायर,मुख्य कार्यकारी धिकारी मुर्गनाथम एम,पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय अधिकारी देवरीचे सत्यम गांधी,तहसीलदार सालेकसाचे नरसय्या कोंडागुर्ले,पोलीस निरीक्षक बोराडे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,भाजपा सालेकसा तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे,आदिवासी नेते तथा कचारगढ चेतना समिती दुर्गाप्रसा yuद ककोडे, आदिवासीचे नेते शंकरलाल मडावी,हनूमंत वट्टी, भाजपा उपाध्यक्ष अरुण हरडे,तसेच मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.