माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती, आर्य वैश्य कोमटी समाज आलापल्ली/नागेपल्ली यांच्या आलापल्ली येथे भव्य माता कन्यका मंदिर व समाज भवन चे लोकार्पण सोहळा संपन्न..

0
4
1

*माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती*

 

 

*आर्य वैश्य कोमटी समाज आलापल्ली/नागेपल्ली यांच्या आलापल्ली येथे भव्य माता कन्यका मंदिर व समाज भवन चे लोकार्पण सोहळा संपन्न*

 

*अहेरी: आलापल्ली येथे आर्य वैश्य कोमटी समाज आलापल्ली/नागेपल्ली यांच्या पुढाकाराने आलापल्ली येथे भव्य कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा व समाज भवन चे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम उपस्थित राहून माता कन्यका मातेचे विधीवत पूजा करून दर्शन घेतले, या वेळी आर्य वैश्य कोमटी समाज आलापल्ली/नागेपल्ली कडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.*

*यावेळी दिलीप बिरेल्लीवार,व्यंकटेश मदेर्लावार,विवेक चेलीयालवार,आलापल्ली उपसरपंच विनोदजी आकनपल्लीवार, मनोज पत्तीवर, साई मिरालवार, रवींद्र तांगडपल्लीवार, राजू बिरेल्लीवार, पुरुषोत्तम यादावार,सह कोमटी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते*