गोंदिया ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस पंधरा वर्षाचा सश्रम कारावास

0
4
1

मा. श्री. एन.डी. खोसे, जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश कं २ गोंदिया यांचे निर्णय

आरोपी विक्रम उर्फ सन्नी ठाकुर यास १५ वर्षाचा सश्रम कारावास

गोंदिया / धनराज भगत

 आज दि. २१ फेब्रूवारी २०२४ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांनी बालकांचे लैगिंक अत्याचारापासुन सरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) २०१२ हया प्रकरणातील आरोपी नामे विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर, वय २४ वर्ष रा. नंगपुरा मुर्री, ता.जि. गोंदिया, यास एकुन १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, आरोपी हा फिर्यादीचा घराच्या वरच्या माळयावर फिर्यादीचे भासरे यांचा थैले तयार करण्याचा कारखान्या होता तेथे आरोपी मजुरीने थैले शिवण्याचे काम करित होता. व दिनांक ०१ डिसेम्बर २०१६ ते १५ डिसेम्बर २०१६ चे दरम्यान फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय ६ वर्ष ६ महिने हि वरच्या माळयावर खेळण्यास किवा कपडे सुकविण्यास/वाळविण्यास नेहमी जात असतांनी तिच्या एकटेपणचा फायदा घेवुन आरोपी लैगिंक छळ करण्याचा उददेशाने तिला जवळ घेवुन तिच्याशी गंमत करून तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करित असे.
 लैगिंक छळ करण्याचा उददेशाने आरोपी त्याचा गुप्तांगला हात लावण्यास बाध्य करत असे. सदर बाब पिडीतीने तिची आई फिर्यादी हिला सांगितले म्हणून पिडितेची आई हिने आरोपी विरुध्द दिनांक १५ डिसेम्बर २०१६ रोजी पो.स्टे. गोंदिया शहर येथे आरोपी विरूध्द तकार केली यावद्युन कलम ३७६ (२) (आय) (एन) भादवि तसेच बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ४,६,९ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन तपासी अधिकारी  मिंलद नवघिरे, पोलीस उपनिरिक्षक, गोंदिया शहर यांनी प्रकरणाचा सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार/ पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील  कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष नोंदवुन व वैद्यकिय तसेच इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
एकंदरित आरोपीचे वकील व जिल्हा सरकारी वकील  महेश एस. चंदवानी यांचे सविस्तर युक्तीवादानंतर मा. श्री. एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ व विशेष सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी नामे विक्रम उर्फ सन्नी देवसिंग ठाकुर, वय २४ वर्ष रा. नंगपुरा मुर्री, ता.जि. गोंदिया, यांस १) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम ०६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व रूपये २,०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास. तसेच २) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो कायदा) २०१२ चे कलम १० अंतर्गत ०५ वर्षांचा सश्रम कारावास व रूपये २,०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावास असा एकुन १५ वर्षाचा सश्रम कारावास व ४०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरणात पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे यांच्या मार्गदर्शनात पैरवी कर्मचारी टोमेश्वरी पटले पो हवा यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.