छत्रपती शिवाजी महाराज जयंतीने मावळ्यांनी गाजवली आमगाव नगरी

0
4
1

आदर्श राज्यकर्ते शिवाजी महाराज…

युवकांनी रक्तदान करून दिला शिवरायांना मानाचा मुजरा…

रैलीत शिवाजी व जिजाऊ कलाकारांनी वेधलें लक्ष…

आरोग्य शिबिरात ३०० शिवप्रेमीची तपासणी…

गोंदिया / धनराज भगत

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम  सोमवारला आमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी कांग्रेसचे अध्यक्ष संजय बहेकार, माजी आ. संजय पुराम,कुणबी समाज समिती चे अध्यक्ष विजय शिवणकर, समाजसेवी योगेश असाटी, अर्चना मडावी, सुरेश हर्षे, गोपाल अग्रवाल,अजय खेतान,सुषमा भुजाडे, मोहिनी निंबारते, अंजु जांभुळकर,बालाराम व्यास, राहुल उजवणे,डॉ. उमेंद्र तिराले,केशव हेमणे,निखिल उके,लक्ष्मण चुटे, से. नि. प्राचार्य एच. के. फुंडे, डॉ. भूषण कलंत्री,कैलास रहांगडाले,डॉ. योगेश पटले,प्रामुख्याने उपस्थित होते.
आयोजीत जयंती उत्सव कार्यक्रमात युवकांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले.
आयोजीत जयंती उत्सव समिती द्वारे कार्यक्रमाचे प्रारंभ ध्वज पूजन , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रावर पुष्पांजली वाहून करण्यात आले.
यावेळी शिवगर्जना नुपूर मानकर यांनी सादर करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमीत्त कार्यक्रमास शिव व्याख्याते प्रा.तुकाराम तुरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आज च्या पिढीला अंगीकृत करण्याचे आव्हान केले.
या वेळी रक्तदान शिबिरात ४५ रक्तदातांनी रक्तदान केले तसेच तालुका आरोग्य विभाग, आपला दवाखाना, प्रा. आरोग्य केंद्र कडून आरोग्य शिबीरात ३०० नागरिकांनी तपासणी केली.
शोभा यात्रा काढून शिवाजी महाराज भूपेश गायधणे, जिजामाता अधिती चौहान यांनी भूमिका साकारली.प्रस्तावना यशवंत मानकर, राम चक्रवर्ती
कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव राजीव फुंडे तर आभार अध्यक्ष शुभम बहेकार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलेश कोडापे, नरेंद्र पाथोडे,प्रमोद उके,मुकेश मेंढे भोला गुप्ता, कृष्णा चुटे,अंकुश शिवणकर, प्रशांत बहेकार,धनलाल मेंढे, राजू भांडारकर,लोकेश बोहरे,संजू बहेकार, दिनेश कावळे, उमेश रहांगडाले,, शरद उपलपवार,सैरभ ब्राम्हणकर, सागर गोंडाने,दुर्गेश येटरे, राहुल उजवने,डॉ. उमाकांत पटले, गोकुल बिसेन,रवी शिवणकर,अरुण लिल्हारे, ओम लिल्हारे,जयप्रकाश मेंढे,नरेंद्र फुंडे,निखिल रामटेके, वि्पृल रामटेके,राजेश बुधराम मेंढे, अनिल कठाणे, शुभम फुंडे, रितेश चुटे,शरद फुंडे,नरेंद्र बोहरे,मुकेश फुंडे, हिमांसू फुंडे, मनिष बहेकार,अनिल बिसेन,हेमंत चावके,राजेश पाथोडे, प्रशांत कोरे, गजू चुरे विजय बहेकार, जितेंद्र येटरे,निखिल लक्षणे,अनुप सोमवंशी,सोनू उईके,लक्की फुंडे, गुड्डू फुंडे,राजाराम फुंडे,तब्बू दोनोडे,अमित हेमने, निलेश हजारे,नितेश दोनोडे,निलेश दमाहे,छोटू हरिनखेडे,राजेश शिवणकर,युवराज हरिनखेडे,बंडू बोपचे,प्रमोद थेर,अविनाश शिवणकर,ओम गुप्ता,रामेश्वर महारवाडे, राहुल पाथोडे,गुरु बोहने,रितेश बहेकार, व आपला दवाखाना, लोकमान्य ब्लड बँक यांनी सहकार्य केले.