पूर्वार्ध खोब्रागडे ठरला सकाळ स्कॉलर स्पर्धेचा विजेता; द्वितीय क्रमांकाची गिअर सायकल मिळाली भेट…

0
3
1

सकाळ चे गोंदिया जिल्हा कार्यालय  सहायक व्यवस्थापक सतिश बघेले यांच्याद्वारे शाळेत दिली भेट

गोंदिया / धनराज भगत

सकाळ वृत्तपत्र समूहाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ‘सकाळ स्कॉलर’ हा स्पर्धात्मक स्तंभ दि. 1 जुलै ते 31 ऑक्टोबर या दरम्यान सुरू केला होता. या स्पर्धेत कुडवा येथील इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वी चा विद्यार्थी पूर्वार्ध वशिष्ठ खोब्रागडे हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला असून नुकताच त्याचे शाळेत येऊन गोंदिया जिल्हा सकाळ कार्यालय सहायक व्यवस्थापक सतिश बघेले व रुपेश भंडारे यांनी मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे यांचे हस्ते सायकल भेट करून अभिनंदन केले.
यावेळी पूर्वार्ध चे पालक वशिष्ठ खोब्रागडे देखील उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल संस्था सचिव सुरेश चौरागडे, शाळेच्या मुख्याध्यापिका आर. एस. चौरागडे, शिक्षक डी. एच. भोयर (वर्गशिक्षक), समीर तिडके, बी. एन. कुथें, एस. एस. डहाके, एस. डी. हिवरे, एम. सी. रंगारी, एम. पी. लिल्हारे, शिक्षिका एन. एस. मोटघरे, एस.पटले, एस. एस. रामटेके यांनी पूर्वार्ध चे अभिनंदन केले.