वसाहतीतील सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट करा, अन्यथा जनांदोलन करणार
गोंदिया / धनराज भगत
नगर परिषद आमगाव अंतर्गत येणाऱ्या रिसामा वसाहतीतील गायत्री मंदिराच्या मागे जोळाबोडी नावाची बोळी आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रिसामा गावचे पाणी या संयुक्त बोडीतून नाल्याद्वारे सोडले जात होते. त्यापैकी मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून खाजगी बोळी मध्ये मातीचा भराव टाकून नवी वसाहत निर्माण कार्य सुरू आहे.या वसाहतीतील सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली नाही. तर काही दिवसातच संपूर्ण नाला ओसंडून वाहून घाण पाणी रस्त्यावर आणि अनेकांच्या घरात शिरणार आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की हे दुर्गंधीयुक्त पाणी नाल्यात साचून पीड़ित नागरिक मणिराम कावळे, वामन कावळे, डॉ. साजिद, खान, विजयालक्ष्मी सभागृहासमोरील घरे, धीरेशभाई पटले यांच्या घरासमोरील नाला पूर्ण भरला आहे. दुर्गंधीयुक्त घाणेरडे पाणी कुजल्याने दुर्गंधी, विंचू, डास यांसारखे अनेक प्रकारचे जंतु निर्माण होऊ लागले आहेत.
येथे राहणाऱ्या लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. काही दिवसात महामारी पसरू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी चौकशी करून ड्रेनेजची व्यवस्था करावी.
वारोंवार नगर परिषद कार्यालय येथे निवेदन देऊन सुद्धा अद्याप कोणतीही अंमलबजावनी झाली नाही.
न.प.ने तात्काळ काही उपाययोजना कराव्यात अन्यथा वसाहतीतील पीड़ित व ग्रस्त नागरिक़ानी आंदोलन /उपोषण करू अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.

