जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज शिष्य मंडळातर्फे महारक्तदान शिबीर संपन्न

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य   सेवा संस्थान आयोजित यांच्या माध्यमातून दि.२० फेब्रूवारी २०२३ रोजी आमगाव तालुक्याच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात जिल्हा परिषद सदस्य छबूताई उके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तम नंदेश्वर, संचालक महेश उके, ग्रामीण रु्णालयाचे डॉ नवरत्न गायधने, डॉ सिंग, डॉ भावना खांबाळकर,नरेंद्र कावळे अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व प्रथम स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तम नंदेश्वर यांनी रक्तदान केलं. तसेच अनेक भक्त व नागरिकांनी रक्तदान केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र महाराज संस्थान आमगाव तालुका प्रमुख राजेंद्र प्रभू भांडारकर, महिला प्रमुख मायाताई शेंडे , खेमंत टेंभरे विदर्भ प्रमुख, गुरूचंद रहांगडाले सेवा प्रमुख , महेश कावळे, दिपक कोसरकर, मनोहर चुटे यांनी अथक प्रयत्न केले.