तुमसर येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2024 मोठ्या थाटात संपन्न

0
86
  • जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
  • वर्षभर विविध सामाजिक कार्याच्या मदतीने प्रत्येकांच्या मनामनात आपलं स्थान निर्माण करणार्‍या छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त “शिवजन्मोत्सव सोहळा 2024” अंतर्गत विविध संस्कृतीशील व नेत्रदीपक अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर करवी महाराजांची जयंती, तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात पोलिस स्टेशन तुमसर अणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्तिक आयोजनातून दिनांक 17/02/2024 रोज शनीवार ला पहाटे 6.00 वाजता ‘शिवस्फूर्ती’ महामॅरेथॉन, व सायं. 7.00 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, व दिनांक 18/02/2024 रोज रविवारला भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘क्लिक टू क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर’ श्री प्रशांत मिश्रा यांच्या सहयोगातून एकूण 520 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्म्यांचे वितरण, रक्तदान शिबिराअंतर्गत एकूण 51 जणांनी रक्तदान केले. तर मोफत बीपी, शुगर, थायरॉईड, दंत तपासणी शिबिरांतर्गत एकूण 352 लोकांची तपासणी करण्यात आली. तर सायं. 7.00 वा. आजकालच्या भ्रष्ट शिक्षण प्रणालीचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी स्वतः तयार करून उत्कृष्ट अभिनयातून *”पंख छाटले पाखराचे”* या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दिनांक 19/02/2024 रोज सोमवार ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अंतर्गत पहाटे 6.00 वा. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या, व अनेकांच्या उपस्थितीत पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पपणानंतर महाराजांची गारद व आरती झाली. महाराजांचे तेज अबाधित राहो या भावनेतून भव्य मशाल प्रज्वलन करून संपूर्ण शहर भ्रमण करण्यात आले. यावेळी विविध नागरिकांच्या सहभागाने या मशाल सोहळ्याला भव्य रॅलीचे स्वरूप आले होते त्यानंतर दुपारी 2.00 वाजता श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे महाराजांच्या जयंतीउत्सवानिमित्त स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. बक्षीस वितरण व महाप्रसादा नंतर साय. 5.30 वा. भव्य व नेत्रदीपक अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यात प्रामुख्याने महाराजांची पालखी, पारंपरिक खेळ लेझीम, दांडपट्टा यासारख्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला केंद्रभूत करून व शहरातील जनता विद्यालय च्या विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध महाराजांच्या चरित्रावर आधारित अशी नृत्यआविष्कार सादर करण्यात आली. शोभायात्रेतील महाराजांच्या वेशभूषेतील प्रतिरूप महाराज असलेली झाकी बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटवनारी होती. उपस्थित पोलिस स्टेशन तुमसर, चे पोलिस बांधवांच्या सहयोगाने हि भव्य दिव्यअशी शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडली. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने “शीवजन्मोत्सव सोहळा 2024” यशस्वी रित्या संपन्न झाला.
Previous articleजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज शिष्य मंडळातर्फे महारक्तदान शिबीर संपन्न
Next articleकचारगड़ यात्रेनिमित्त वाहतूक बदल