कचारगड़ यात्रेनिमित्त वाहतूक बदल

0
52

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया जिल्ह्यात मौजा कचारगड (धनेगाव) येथे २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत “महाकाली कंकाली कोपरलिंगा” निमित्ताने यात्रा होणार आहे. सदर यात्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. त्या ठिकाणी भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गर्दी होते. आमगांव-सालेकसा-डोंगरगड या मार्गावरून गोठ्या प्रमाणात जड-अवजड मालवाहु वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे जड-अवजड वाहनापासुन यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता आगगांव कडून डोंगरगड कडे येणारे व जाणारे अवजड मालवाहु वाहने (एस.टी. बस, अग्नीशामन वगळून) २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सकाळी ०५.०० वाजता ते सायंकाळी १९.०० वाजता पर्यंत बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी जारी केली आहे.
        आमगांव कडून डोंगरगड कडे येणारे व जाणारे अवजड मालवाहू वाहने (एस.टी. बस, अग्नीशामन वगळुन) २२ फेब्रुवारी २०२४ ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सकाळी ०५.०० ते सायंकाळी १९.०० पर्यंत बंद करण्यात येत असून डोंगरगडकडून सालेकसा मार्गे आमगांवकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना चोरतलाव देवरी आमगांव हा पर्यायी मार्ग उपलब्ध असून आमगांव- सालेकसा- डोंगरगड मार्गे जाणारे जड-अवजड वाहनांना आमगांव-देवरी-डोंगरगड (छ.ग.) या पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

      रेल्वे थांबा वेळेत वाढ :- कचारगड यात्रेनिमित्त दरेकसा रेल्वे स्थानक येथे ज्या रेल्वे सवारी (यात्री) गाड्या थांबतात त्या रेल्वे गाड्यांचा थांबा 2 मिनिट आहे आता यात्रेनिमित्त तो वाढवून पाच मिनिट पर्यंत करण्यात आलेला आहे.