गोंदिया ब्रेकिंग :- ‘ते’ घरुन पळून गेलेले अल्पवयीन मुले अखेर गोंदिया पोलिसांना सापडले…

0
5
1

गोंदिया / धनराज भगत

भिमनगर गोदिया येथील दोन अल्पवयीन मुले वय वर्षे १२ आणि ११ वर्षे हे दोन्ही नेहमी प्रमाणे दि.२१/०२/२०२४ रोजी शाळेत गेले होते… परंतु सायंकाळी शाळेतुन घरी परत आले नसल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शाळेत व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला.. परंतु ते दोघेही मिळुन आले नाहीत…. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती गोंदिया शहर पोलीसांना दिली… यावरुन गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कदम व सहायक पोलीस निरीक्षक  विजय गराड, यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लगेच मुलांचे शोध संबंधाने गोंदिया शहरातील सोशल मिडीयावर मुलाची माहिती प्रसारीत केली आणि त्यांच्या अधिनस्त कर्तव्या वरील पोलीस अंमलदार व चार्ली पथकातील अंमलदार यांना सुचना देवून शोध घेण्याबाबत कळविले…. दोन्ही मुलांचा शोध घेत असताना कळले की,एक अल्पवयीन मुलगा हा यापुर्वी सुध्दा विदर्भ एक्सप्रेस ने पळुन गेलेला होता व तो अकोला रेल्वे स्टेशनवर मिळुन आला असल्याबाबत पोलीसांना माहिती मिळाली. त्यावरुन पोलीसांनी नागपुर, वर्धा, अकोला येथील आर.पी. एफ. व जी.आर.पी. पोलीसांना सदर मुलांची माहिती व फोटो पाठवुन शोध घेण्याबाबत सुचीत केले… .सदर माहितीवरुन वर्धा येथील रेल्वे पोलीसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना रात्रीच वर्धा रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेवून विचारपुस केली असता स्वतःच घरुन पळुन आले असल्याबाबत कळविले…सदरची माहिती मुलांच्या पालकांना देवून वर्धा येथे जाण्यास सुचीत करण्यात आले… त्यावरुन पालकांनी वर्धा येथे जावून त्यांची दोन्ही अल्पवयीन मुले सुखरुपरीत्या त्यांच्या ताब्यात मिळाले असल्याबाबत पोलीसांना कळविले….

सदरची दोन्ही अल्पवयीन मुले दिसून येत नसल्याबाबत गोंदिया शहर पोलीसांना माहिती मिळताच शहर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न लावता अथक परिश्रम बुध्दी कौशल्याच्या वापर करुन तत्परतेने अवघ्या काही तासातच दोन्ही मुलांचा शोध घेतलेला आहे….

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ कदम, सपोनि विजय गराड, पो.हवा. हुकरे, कोरे, सुदेश टेंभरे, पोशि. सुभाष सोनवाणे, पटले, मदारकर यांनी केली आहे…