अहेरी /प्रतिनिधी
आधुनिक काळात नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललेला आहे.या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांनी वर्ग अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना ते अधिक चांगले समजते त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अद्यावत करून विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गात शिकवावे असे आवाहन सुलभक सचिन मावलीकर यांनी केले आहे. अहेरी येथील मॉडेल स्कूलच्या सभागृहातमाध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस ते शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीच्या संदर्भात सदर माध्यमिक शिक्षकांना शासनाच्या वतीने सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात अहेरी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी हजेरी लावली आहे. सदर प्रशिक्षण हे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सुरू आहे. पंचायत समिती अहेरी येथील शिक्षण विभागाचे गट समन्वयक बुरसे सर, गोंगले सर ,मेश्राम सर, गोबाडे सर हे प्रशिक्षण देत आहेत.