1
पाणी पुरवठा अनियमित जनता त्रस्त
वर्षातुन सहा महिने मिळतो पाणी बिल मात्र पूर्ण वर्षाचा
गोंदिया / धनराज भगत
मागील पाच वर्षा पासून नगरात नळ द्वारे होत असलेला पाणी पुरवठा अनियमित होत असल्यामुळे महिला त्रस्त झालेले आहेत.एक दिवसा आड नळ शुरू करतात त्यातही अर्धा तास पेक्षा जास्त वेळ देत नाही त्यामुळे पुरेसा पाणी मिळत नाही.नळ शुरू करण्याची निश्चित वेळ नाही.अशी तक्रार करण्या करिता रण चौक वार्ड नं 3 ची महिला मंडळने दि.२२ फेब्रूवारी २०२४ रोजी नगर परिषद वर धडक दिली. परंतु त्या ठिकाणी जवाबदार अधिकारी नदारद होते.
नगर परिषदचे प्रशासन,कामकाज प्रशासक द्वारे होत असल्या कारणाने जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे.कोणीही अधिकारी,कर्मचारी जनतेची कोणतिच समस्या,तक्रार ऐकून घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाही. त्यामुळे जनतेने कुणाकडे जावे हेच समजत नाही.ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे.
आमगांव नगरात आधी दररोज नळ येत असे परंतु मागील जवळपास पाच वर्षा पासून एक दिवसा आड किंवा कधी कधी दोन-दोन दिवस नळ येत नाही.यामुळे सगळी जनता व महिला त्रस्त झाले आहेत.वर्षातुन सहा महिन्या पेक्षा कमी दिवस नळा द्वारे पाणी पुरवठा होतो मात्र बिल पूर्ण वर्षभराचा वसुल केला जातो.
नगर परिषदचे मुख्य अधिकारी करिश्मा वैद्य महिन्यातुन फक्त चार-दिवसच कार्यालयात उपस्थित असतात.त्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाही.फोन केला तर फोन रिसीव करीत नाही.आमगांव नगर परिषद लावारिस झाली की काय अशी आम जनतेत चर्चा सुरू आहे.
आमगांवला पाणी पुरवठा करण्यासाठी अडीच लाख लीटर ची एकच जलकुम्भ आहे व जवळपास नऊसे नळ जोडनी आहे.त्यामुळे एकाच वेळेस सम्पूर्ण आमगांव नगरात पाणी पुरवठा करता येत नाही.त्यामुळे वेगवेगळ्या वार्ड मध्ये आळी पाळीने पाणी पुरवठा करण्यात येतो.असे त्याविभागाचे कर्मचारी पांडे यांनी माहिती दिली.