सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव न.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा

0
47

दोन्ही नगराध्यक्ष सह ८ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

गोंदिया / धनराज भगत

सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन्ही नगरपंचायत मध्ये 2 वर्षापूर्वी सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष अस्तित्वात होते. परंतु दोन्ही नगराध्यक्ष व इतर 11 नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पुन्हा आज दिनांक 22 रोजी खासदार श्री प्रफुल पटेल यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी गंगाधर परशुरामकर, राकाचे सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेवक दानेश साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचेसह सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक देवचंद तरोने, शशिकला टेंभुर्णीकर, दीक्षा भगत, कामिनी कोवें यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर आज पार पडलेल्या विषय समिती सभापती व सदस्याची निवडणुकीत अस्लेष अंबादे, गोपीचंद खेडकर, सायमा शेख, महेंद्र वंजारी यांनी महायुती धर्म निभवत समर्थन दिले. तर अर्जुनी मोरगाव येथील नगराध्यक्ष मनिषा बारसागडे, नगरसेवक सागर आरेकर, दिशा शहारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उल्लेखनिय असे की सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन्ही नगरपंचायत मध्ये आज विषय समिती सभापती व सदस्याची निवड प्रक्रिया पार पडणार असताना निवडणूक प्रकियेपूर्वी पक्ष प्रवेश करण्यात आला हे विशेष.

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील नवनियुक्त विषय समिती सभापती व पक्ष प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सुरेश हर्षे, केतन तुरकर, डी यु रहांगडाले, नानू मुदलियार, सचिन शेंडे, चंद्रकुमार चुटे, जिम्मी गुप्ता, शैलेश वासनिक, सुनील पटले, कपिल बावनथडे सह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleआमगांव नगर परिषदवर महिलांची धडक
Next articleखूप वर्षानंतर भंडारा आणि गडचिरोली या लोकसभेवर पंजा पाहायला मिळणार : नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य