आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा
गोंदिया / धनराज भगत
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी कडून योग्य उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भंडारा आणि गोंदिया या लोकसभेवर महायुतीकडून भाजपाचा उमेदवार लढण्याची शक्यता आहे.. तर महाविकास आघाडीचा तिढा अद्याप पर्यंत सुटलेला नसला तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता गडचिरोली आणि भंडारा या दोन्ही लोकसभांवर खूप वर्षानंतर काँग्रेसचा पंजा पाहायला मिळेल असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले… गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील कचारगड येथे होत असलेल्या भव्य यात्रेच्या दौऱ्यावर असताना आमगांव येथील गांधी चौकात गांधी प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले आहे.

