दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

0
95

गोंदिया / धनराज भगत

दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत असून आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत एका तरुण शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला असून हे सरकार शेतकरी विरोधी आहे. देशाचे प्रधानमंत्री लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना आतंकवादी खालीस्तानी आणि आंदोलनजिवी म्हणत असतील तर यापेक्षा शेतकऱ्यांचे दुसरे दुर्दैव काय ? असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला..