कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींवर सिहोरा पोलिसांची कारवाई ; 27 जनावरांची सुटका

0
56

जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले

तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या साँड्या शेतशिवारात जनावरांची अवैध तस्करी करणाऱ्या आरोपींवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 27 जनावरांची सुटका केली. सविस्तर वृत्त असे की, सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग वर असताना त्यांना सोंड्या ते टेमनी मार्गावरील शेतशिवारात 27 जनावरे एका आखूड दोराने निर्दयतेने पायदळ नेतांनी निदर्शनास आले. याप्रकरणी आरोपी राजकुमार रामा नागपुरे, दिनेश तांडेकर, आशिष चौधरी तिघेही रा. मोहगाव नांदी, ता. तिरोडी, जि. बालाघाट म. प्र.तर हरिचंद बागडे रा. खंदाळ,ता. तुमसर यांच्याविरुद्ध विविध कलमानव्ये सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेतलेले 27 जनावरांना चिखला येथील गौशाळेत रवाना करण्यात आले आहे. सदर कारवाई सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस शिपाई महेश गिरीपुंजे, पोलीस अंमलदार तिलक चौधरी व पोलिस हवालदार राजू साठवणे यांनी केले असून घटनेचा पुढील तपास पो.हवा.मनोज इळपाते करीत आहेत.