पालडोंगरी येथील ‘सेवा सहकारी संस्था’ कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न

0
7
1

गोंदिया / धनराज भगत

सेवा सहकारी संस्था पालडोंगरीचे कार्यालय हे किरायाने असून स्वतःची इमारत अजूनही नाही. या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या खाजगी  इमारत कार्यालयासाठी  प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मात्र विद्यमान अध्यक्ष सितकूरा पटले व सर्व सदस्यांनी प्रयत्न केले असता यांच्या प्रयत्नांना यश आले असुन यांच्या कारकिर्दीमध्ये सेवा सहकारी संस्था पालडोंगरीच्या कार्यालयाचे भूमिपूजन ग्रामपंचायत पालडोंगरी परिसरात ऋषी टेंभरे यांच्या घरासमोर भूमिपूजन करण्यात आले.भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य पवन पटले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी  प्रमुख उपस्थिती संस्थेची सचिव जे. ए. खोब्रागडे, सितकुराजी पटले, भुवन गौतम, मोहन गौतम, गणराज पटले, तुकाराम रहांगडाले, उमेश रहांगडाले भरत टेंभरे व सर्व सदस्य, सरपंच चंद्रकुमार चौधरी व उपसरपंच विनोद उईके व सर्व सदस्य, रेखलाल रहांगडाले, ऋषी टेंभरे, घनश्याम भजभुजे, विजय भजपुजे, चंद्रशेखर रहांगडाले, सलीम मरस्कोले, गणेश शेंडे, दीपक भास्कर तसेच गावातील सर्व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.