गोंदिया / धनराज भगत
सध्या देशात महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे विद्यार्थिनींच्या संरक्षणाचा मुद्दा काळाची गरज बनली आहे. यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या रक्षणासाठी सज्ज राहणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शुक्रवारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी यांनी मुलींच्या प्रशिक्षणात दरम्यान व्यक्त केले.
सेल्फ डिफेन्स आणि मार्शल आर्ट असोसिएशन जिल्हा गोंदिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रशिक्षणाच्या कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला होता, त्यामध्ये डी. फार्म व बी. फार्म मिळून ९५ मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आकाश पटले यांच्यामार्फत देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या. भविष्यामध्ये संरक्षणासाठी याच प्रकारचे कार्यक्रम नियमित रूपाने घेऊ याची ग्वाही रासेयो प्रमुख डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी दिली.

