प्रभाकर लोंढे यांची मुख्याध्यापक पदोन्नती मा. उच्च न्यायालयाने केली रद्द; जी. जे. परदेशी यांना मुख्याध्यापक पदोन्नती देण्याचे आदेश

0
73

गोंदिया / धनराज भगत

जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील कार्यरत मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे यांना दिलेली मुख्याध्यापक पदोन्नती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करण्यासंदर्भात निर्णय 8/02/2024 रोजी दिला. 2014 मध्ये जिल्हा परिषद तर्फे मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, त्यामध्ये ( विजा – अ) ची जागा असताना सुद्धा विजा- अ प्रवर्गातील उमेदवाराला पदोन्नती न देता प्रभाकर लोंढे (भज क) प्रवर्गातील उमेदवाराला पदोन्नती दिलेली होती या संदर्भात श्री. जी. जे. परदेशी यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या संदर्भात कोणती तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी विभागीय आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार केली होती विभागीय आयुक्त यांनी कारवाई करण्यासंदर्भात निर्णय दिलेले होते.
त्या अनुषंगाने 2018 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजा दयानिधी साहेब यांनी प्रभाकर लोंढे यांची मुख्याध्यापक पदोन्नती आदेश रद्द केले होते, त्या आदेशाला प्रभाकर लोंढे यांनी अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. अप्पर आयुक्त यांनी लोंढे यांच्याकडे निर्णय दिला होता. त्या निर्णयाला परदेशी यांनी उच्च न्यायालयात चॅलेंज केले होते, माननीय उच्च न्यायालयाने अप्पर आयुक्त यांनी दिलेला निर्णय चुकीचा होता तो रद्द करण्यात यावा व परदेशी यांना 2014 पासून पदोन्नती द्यावी या संदर्भातील आदेश दिला. 2018 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी रद्द केलेले मुख्याध्यापक पदोन्नतीचे आदेश कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेने केलेली कारवाई योग्य होती या संदर्भात ऍडव्होकेट कापगते यांनी जिल्हा परिषद तर्फे बाजू मांडली. प्रभाकर लोंढे यांना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक पदी आदेशीत केले आहे. जी. जी. परदेशी यांच्यातर्फे ईश्वरचंद्र चौधरी एडवोकेट यांनी काम पाहिले दहा वर्षाच्या संघर्षानंतर विजय झाल्यानंतर मित्रमंडळीने त्यांच्यावर अभिनंदन स्वागत केले आहे.
Previous article‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा बाम्हणी शाळा तालुक्यातून प्रथम
Next articleआमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट