आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी केंद्र अंजोरा पंचायत समिती आमगाव या शाळेचा आमची शाळा आदर्श शाळा अंतर्गत आमगाव तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. सदर उपक्रम युक्त स्पर्धा जिल्हा परीषद व अदाणी फाऊंडेशन सयुंक्त विद्यमाने आयोजित केली आहे. यांमध्ये भौतिक सुविधा, व गुणवता यावर गुण असतात. भौतिक सुविधा व गुणवत्ता यात जिल्हा परिषद शाळेचा दर्जा वाढवून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा दर्जेदार शिक्षण मुलांना मिळावं यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये बाम्हणी शाळेने चमकदार कामगिरी बजावली आहे. शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम, शाळेचे शिक्षक एम. टी. जैतवार , पुष्पा गौतम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रशिला भेदे, सरपंच सुभाष थेर, राजेश रहिले देवराज धावळे, दमयंता नागरिकर, उपसरपंच उषा राऊत, शिला रहिले पोलिस पाटील, जनार्दन शिंगाळे , मनीष बावणे सर्व शाळा व्यव स्थापन समिती चे सर्व सदस्य, ग्राम पंचायत समितीच्या सर्व सदस्य , सर्व गावकरी, पालक वर्ग सर्व विध्यार्थी यांनी शाळा सुंदर आणि गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न केले.