गडचिरोली /प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम चे श्री दिलीप बारसागडे सर उच्च श्रेणी मु. अ. व श्री. कोसे सर मु. अ. बोंदागुडम यांची पद्दोन्नती झाल्याने निरोप तथा सत्कार समारंभ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम येथे शाळा व्यवस्थापन समिती लगाम व ग्राम पंचायत लगाम, जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले , कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेदिका ताई गणलावार तर, प्रमुख अतिथी म्हणून श्री धनंजय कांबळे साहेब गटशिक्षणाधिकारी मुलचेरा हे होते, यावेळी सत्कार मुर्ती चा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले, कार्यक्रम प्रसंगीं माननीय गटशिक्षणाधिकारी मुलचेरा यांनी सत्कार मुर्ती च्या कामाचे कौतुक केले व पुढील काळात उत्कृष्ट कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम प्रसंगीं लगाम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कोमरेवार सर, लगाम शाळेचे मुख्याध्यापक श्री समुद्रालवार सर, लगाम ग्रामपंचायत चे सरपंच श्री दिपकजी मडावी, उपसरपंच श्री मधुकरजी गेडाम व सचीव श्री राकेश दुर्गे साहेब, याचे समयोचित आपली मते प्रकट केली अतिथी म्हणून श्री श्रीकोंडावार सर गटसमन्वयक मुलचेरा फुलोरा समन्वयक महेश मडावी सर, श्री दिवाकर मादेशी सर तंटामुक्ती समिती लगाम चे अध्यक्ष श्री क्रिष्णा गावडे व पोपा. गिरमाजी मडावी, कार्यक्रमाचे संचलन श्री किशोर कोंडावार सरांनी तर आभार प्रदर्शन श्री नागपुरवार सरांनी केले. कार्यक्रम चे यशस्वीतेसाठी .श्री अशोक दुर्गे सर व कु. दाहगावकर मॅडम, बंडावार मॅडम, श्री सुरेश मडावी सर, श्री अशोक दुर्गे सर, श्री शिवराम मडावी सर यांनी प्रयत्न केले, या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती लगाम चे सर्व सदस्य, , ग्रामपंचायत चे सदस्य व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

