श्री कृष्ण गौरक्षण सभा(पांजरापोल) येथे खा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
11
1

 

गों दिया / धनराज भगत

दि.२५फेब्रूवारी २०२४ रोजी खा. प्रफुल पटेल यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून गौशाळेचा विकास व सोयी – सुविधेकरिता श्री कृष्ण गौरक्षण सभा (पांजरापोल) गोंदिया येथे परिसराला आवारभिंत, दोन सभागृह अश्या एकूण 25 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन,यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून माजी आमदार  गोपालदास अग्रवाल, सौ. शुभांगीताई मेंढे, श्री कृष्ण गौरक्षण सभा अध्यक्ष  दामोधर अग्रवाल उपस्थित होते.

खा. प्रफुल पटेलजी यांचा माध्यमातून विकास कामे करतांना गौमातेची सेवा करण्याची संधी मिळाली हे मी आमचे सौभाग्य समजतो. भविष्यात सुध्दा आम्ही नि:स्वार्थ भावनेने गौमातेच्या व श्रीकृष्ण गौरक्षण सभा (पांजरापोल) च्या उन्नती व प्रगतीकरीता कार्य करीत राहणार असे प्रतिपादन श्री राजेंद्र जैन यांनी केले.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांची आश्वासन पूर्ती

श्री कृष्ण गौरक्षण सभा व्दारा आयोजित श्री गोपाष्ठमी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात खा.  प्रफुल पटेल यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपयांच्या विकास कामांचे आश्वासन माजी आमदार  राजेंद्र जैन यांनी दिले होते. आज या आश्वासनाची पूर्ती करीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करुन करण्यात आले.

या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार श्री राजेन्द्र, सौ. शुभांगीताई मेंढे, श्री कृष्ण गौरक्षण सभा अध्यक्ष दामोधर अग्रवाल, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष  अजय अग्रवाल, बालकिसनजी शास्त्री,  शंकरलालजी अग्रवाल,  आकेश अग्रवाल,  आनंद अग्रवाल, सौ. शितल मुरारका,  नानू मुदलियार, रौनक ठाकूर, शरभ मिश्रा सहीत कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी, सदस्य व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अपूर्व अग्रवाल यांनी केले.