ब्रेकिंग : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
28
1

न्यूजप्रभात वृत्तसेवा

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येतेय.पंकज यांनी ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते. जे हिंदी चित्रपट आणि भारतीय संगीतविश्वातील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले.
पंकज उधास गेले दिवस पॅनक्रियाज कॅन्सरशी (स्वादुपिंड) झुंज देत होते. त्यांच्या मुलीने पोस्ट करत दुःखद व्यक्त केलंय की, “अत्यंत जड अंत:करणाने, 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे.” पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमी येताच संगीतविश्वाव भारतीय मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
साभार : ऑनलाइन लोकमत