आमगाव रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट…

0
5
1

अमृत भारत स्टेशन योजनेत स्थानक अंर्तभूत….

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या रेल्वेस्थानकाला अमृत भारत योजनेत समाविष्ट करवून रेल्वे प्रशासनाने योजना अंमलबजावणीच्या दुसऱ्या टप्प्यात आमगाव,भंडारा व तुमसर या रेल्वे स्थानकाचा समावेश करून निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वेस्थानकअधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे.
अमृत भारत स्टेशनअंतर्गत समावेश करण्यात आलेला असून आज आमगाव रेल्वे स्टेशन चे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन द्वारे शिलान्यास करण्यात आले तसेच यावेळी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, भाजपाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पटले, शहराध्यक्ष पिंटू अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार असून रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण, बाग निर्मिती, आकर्षक व सुसज्ज इमारत,पार्किंग व्यवस्था, हायमास्ट लाइट, दिव्यांग व ज्येष्ठाकरिता लिफ्ट, कॉनकोर्स विकास, भुवनेश्वर मॉडलचे शौचालय तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.बाजुला सीटी सेंटर, स्वयंचलित पायरीसह अनेक दर्जेदार कामे व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष गणमान्य नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.