मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानामध्ये खाजगी व्यवस्थापनामध्ये संत जयरामदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ठाणा शाळा आमगाव तालुक्यात प्रथम

0
42
1

ठाणा / सरोज कावळे

राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ‘अभियान राबवित आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान सद्यस्थितीत राज्यभरात सुरू असून १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्हयातील सर्व शाळांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. त्यादृष्टीने संत जयरामदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ठाणा ही शाळा स्पर्धेत उतरली होती. या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा व उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबाबत आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.अर्चना आयचीत मॅडम,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.विशाल डोंगरे साहेब,ठाणा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री.पटले सर,संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी शिवणकर , शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी. पाऊलझगडे सर, सुरश्यामजी कटरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या साफल्यतेसाठी पालक वर्ग,माता पालक संघ आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.