गोंदिया / धनराज भगत
खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधी या योजने अंतर्गत मौजा- बोरकन्हार (बाम्हणी ) ता.आमगांव जि.गोंदिया येथे ५ लक्ष रूपयांचे सि.सि.रोड, मंजुर कामाचे भूमिपूजन आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवार ला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे
अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपाचे जेष्ठ नेते तथा शिक्षण महर्षी झामसिंगजी येरणे, आमगांव भाजपा तालुकाध्यक्ष राजु पटले, शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल,सरपंच रविंद्र घरत, पं.स.सदस्य तिलक मडावी, अनिल सहारे,जूमक बोपचे, राजकुमार कापसे,सुनिता बिसेन,दुर्गाताई बोपचे,तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

