आज दि. २७ फेब्रूवारी २०२४ रोजी आदर्श सार्वजनिक वाचनालय आमगांव च्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पडोळे तर प्रमुख पाहुणे सचिन बोरकर यांनी प्रख्यात कवी वि.वा .शिरवाड़कर यांच्या जयंती निम्मित मराठी भाषेचे वैभव,वारसा व महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय ऊके यानी केले.व कार्यक्रमाच्या यशश्वी तेसाठी ग्रंथपाल जगदीश बड़गे,श्रीमती कल्पना शहारे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात वचनालायातील स्पर्धा परीक्षा वाचक सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.