रेल्वे लाईन ब्रीजमुळे विना अडथल्याने वाहतूक होणार गतिशिल :- सुधीर पटले

0
10
1

रेल्वेचे कायापालट रेल्वे मंत्रालयाचे नागरिकांनी मानले आभार

गोंदिया / धनराज भगत

अमृत भारत हा रेल्वे महामार्ग विकास व रेल्वस्थानकापासून तर रेल्वे मार्ग मोकळा करून ओहर ब्रीज बांधकाम योजना कार्यान्वित करून मोदी सरकारने नागरिकांना उन्नत कार्याने रेल्वे व नागरिकांना स्वर्णीम भेट दिलेली आहे असे मत चीळचाळबांध रेल्वे ओहर ब्रीज बांधकामाची शिलान्यास भिंत प्रसंगी उपसरपंच सुधीर पटले यांनी व्यक्त केले.
सरकारने योजना अंतर्गत देशभरात मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा ५५४ रेल्वे स्टेशन चा पुर्णविकास व १५०० रोड ओवर ब्रिज / अंडरपास उद्घाटन मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी द्वारा व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातुन कऱण्यात आले.
खासदार अशोक नेते यांनी सतत नेहमी सातत्याने रेल्वे संबंधित पाठपुराव्याने प्रयत्नाला यश येऊन पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते आयोजीत समारोह कार्यक्रमात व्हिडिओ कॉम्प्रेसिंग च्या माध्यमातून रेल्वस्थानकापासून तर रेल्वे मार्ग व ओहर ब्रीज बांधकामाचे शिलान्यास केलें .
आमगाव तालुक्यात अमृत भारत रेल्वे स्टेशनचा खासदार अशोक नेते यांनी केलेल्या प्रयत्नाने गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील आमगाव येथे अमृत भारत रेल्वे स्टेशन समाविष्ट करण्यात आल्याने अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत आमगांव या रेल्वे स्टेशन चा समावेश करण्यात आले.
अमृत भारत रेल्वे स्टेशन व चिरचाळबांध रेल्वे ब्रीज अंतर्गत आमगांव चा उद्घाटन अमृत भारत स्टेशन स्कीम योजना मध्ये आमगांव या रेल्वे स्थानकांसाठी ७.१७ करोड रूपये मंजूर करून घेतले यामुळे
आमगांव रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट होऊन नागरिकांना यांचा निश्चितच फायदा होईल.
अमृत भारत कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने प्रशंसनीय आणि ऐतिहासिक विकास कामे केली
अमृत ​​भारत स्थानक योजनेद्वारे रेल्वे विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशन पोहोचणे,वेटिंग, हॉल,मोफत वाय-फाय, यासारख्या नागरिकांच्या आधुनिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहेत. आमगांव या स्टेशनचा पुनर्विकास खर्च: ७.१७ कोटी रुपये मंजूर झाले याचा फायदा आमगांव तालुक्यातील नागरिकांना होईल. असे प्रतिपादन सुधीर पटले यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम, जि. प. सदस्य हनवत वट्टी, सरपंच ललिता भाजीपाले,ग्राम पंचायत सदस्य भारती ठाकरे, देवलाल रहांगडाले,शिला बाटबर्वे, योगेश्वरी जगणे, अंतकला भांडारकर, रुपकला आंबेडारे,ग्राम सचिव अधिकारी विजय बीसेन, देवव्रत मजुमदार रेल्वे यांत्रिकी अभियंता, विजयसिंह ,भुवन प्रकाश शिवणकर, केवलचंद भाजीपाले व मोठया संख्येने नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. नागरिक उपस्थीत होते.