गोंदिया / धनराज भगत
दि. 27 फेब्रूवारी 2024 रोजी भवभुती शिक्षण संस्था आमगांव द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या उत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाची योगदान दिले होते याशिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष स्थान निर्माण करून देण्यात त्यांच्या मुलाच्या वाटा आहे. मराठी भाषा हे ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून त्यांच्या जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. डी. के. संघी व राजसेयो प्रमुख डॉ. यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मालार्पण केले तसेच त्यांच्या जीवनसैलीवर प्रकाश टाकले. कार्यक्रमाचे संचालन मि. अभय जगणे यांनी केले व उपस्थित मान्यवरांची विशेष आभार कु.जिया कावळे हिनी मानले.