श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टि. ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय सायन्स दिवसाचे आयोजन

0
4
1

गोंदिया / धनराज भगत

भवभुती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे आज (दि.28) राष्ट्रीय सायन्स दिवसाच्या निमित्ताने फार्मा मॉडेल एक्सपो 2024 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या उद्घाघाटन प्रसंगी भवभुती महाविद्यालय आमगाव येथील श्री जयेंद्र नाकाडे व श्री विशाल राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.के. संघी व उप-प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर उपस्थित होते.
सदर प्रदर्शनीमध्ये 15 विविध फार्मसी मॉडेल डी. फार्म आणि बी. फार्म च्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात ठेवले होते. कार्यक्रमापरांत प्रथम तीन मॉडेलची निवड परीक्षकाने केली होती त्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांना पारितोषिक व सर्टिफिकेट देण्यात आली. प्रदर्शनी सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक  जितेंद्र शिवणकर, चेतन बोरकर,  परमेश्वर वानखेडे, अनिल सोरी, देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, कु. रोशनी अग्रवाल, मनीषा बिसेन, कु. रितू कोरे, दीक्षा खोब्रागडे व इतर प्राध्यापक गण यांनी परिश्रम घेतले.