सिमेंट कॉक्रेटच्या दगडाच्या धडकेने वाहन अपघातात वाहनचालकाचा मृत्यु

0
48

गोंदिया / धनराज भगत

दि. २६फेब्रूवारी २०२४ चे रात्री अंदाजे १०:०० वा. ते दि. २७ फेब्रूवारी२०२४ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील आरोपी मृतक निलचंद हिरलाल शरणागत वय ४५ वर्ष रा टाकरी ता. आमगाव जि. गोदिया हा त्याचे स्वतःचे मोटर सायकल क. एम एच ३५ एएन ७९७३ एस एफ डिलक्स गाडी नी आमगांव वरुन घरी परत येत असतांनी आपल्या ताब्यातील मोटर सायकल भरधाव वेगाने व हयगयीने चालवुन कालीमाटी येथील कटरे राईस मिल व गोयल कॉन्व्हेंटच्या मधात असलेल्या रोडवर दिशा दर्शविणा-या सिमेंट कॉक्रेटच्या दगडाला धडक मारुन दगड व गाडीसह रोडाचे बाजुला पडुन स्वतःचे मरण्यास कारणीभूत झाल्याने फिर्यादी कुवरलाल मूलचंद गौतम यय ५८ वर्ष, रा. टाकरी ता. आमगाव यांच्या तक्रारीवरुन पोस्टे आमगाव येथे अप क ८५/२०२४ कलम २७९,३०४ (अ) भादवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा/१६०६ चौधरी पोस्टे आमगाव, हे करीत आहेत.

Previous articleअदासी येथे भव्य पशुपक्षी प्रदर्शनी
Next articleसंत शिरोमणी आचार्य विद्या सागर जी महाराज के संघ के १५ साधुओं का कल गोंदिया में आगमन