गोंदिया / धनराज भगत
दि. 28 फेब्रूवारी 2024 बुधवार रोजी के.के. इंग्रजी शाळा आमगाव येथे शाळेचे प्रमुख डॉ. डि.के. संघी सर व प्राचार्या श्रीमती रीना भुते यांच्या उपस्थितीत “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने शाळेत विद्यार्थ्यांद्वारे विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन पी. एस. तुरेकर व के. पी. उके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे परीक्षणही करण्यात आले. ह्या प्रदर्शनीत विद्यार्थ्यानी खूप मोठ्या प्रमाणात भाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट बनवले व आपल्यातील असलेल्या वैज्ञानिकांचे दर्शन घडविले.
तसेच डॉ. डि.के. संघी आणि आलेले परीक्षक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले अशाप्रकारे कार्यक्रम पार पाडण्यात आला.

