लोकसभा निवडणुकीला घेऊन राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. या अनुसंगाने सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निहाय निरीक्षकांनी नियुक्ती केली आहे. यामध्ये गोंदिया विधानसभा निरीक्षक म्हणून कृउबासचे उपसभापती राजकुमार पटले यांनी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या निवडी श्रेय जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, अशोक गुप्ता यांच्या वरिष्ठ पदाधिकार्यांना दिले आहे.